‘सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प’ – प्रवीण दरेकर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार केला असल्याचे, प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक घटकांचा सर्वव्यापी विचार करत काहीतरी देण्याच प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया प्रवीण […]

‘सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प’ – प्रवीण दरेकर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार केला असल्याचे, प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक घटकांचा सर्वव्यापी विचार करत काहीतरी देण्याच प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रालाही महत्त्व देण्यात आले आहे. अर्थसंकल्पामध्ये सहकारी संस्थांना कररचनेमध्ये दिलासा देण्यात आला आहे. तसेच युवकांचा सकारात्मक विचार करण्यात आला असल्याचे दरेकर म्हणाले. तर उद्योग क्षेत्राला बळकटी देण्याचा प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आला असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number