मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत आंतरमंत्रालयीन विचार सुरू असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आता मराठी भाषेला सुद्धा मराठी भाषेच्या दर्जाचे आश्वासन राज्यसभेत केंद्र सरकारने दिला आहे.