नाशिकमध्ये अपघाताचे सत्र सुरूच आहे. नाशिकमध्ये तपोवन कॉर्नरजवळ शिवशाही बसचा अपघात झाला आहे. औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर ६ जण जखमी झाले आहेत.
नाशिकहून शिवशाही बस औरंगाबादकडे रवाना झाली. या बस चालकाचे तपोवन कॉर्नरजवळ बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळ ही बस थेट उड्डाणपुलाखाली ४४ नंबरच्या खांबाला आदळली. या दुर्घटनेमध्ये समोर आलेला दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर सहा जण जखमी झाले आहे. जखमी रुग्णांन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये शिवशाही बसचा अपघात झाला तर दुसरीकडे नाशकात एक कार थेट किराणा दुकानात घुसली. नाशिकमधील निफाड येथे एक भरधाव कार दुकानात घुसल्याची घटना घडली आहे. या कारचा चालक मद्यधुंद असून कार चालवत असल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना निफाड रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.