जेलेन्स्की युक्रेनमध्येच, युक्रेनच्या संसदेचा दावा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी युक्रेन देश सोडल्याचा दावा रशियन माध्यमाने केला होता. मात्र, युक्रेनने रशियाचा दावा फेटाळून लावला आहे. जेलेन्स्की यांनी देश सोडला नसून ते कीवमध्ये असल्याचे युक्रेनच्या संसदेने सांगितले आहे. युक्रेनने रशियाच्या दाव्याचे खंडन केले आहे. युक्रेनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की कीवमध्ये असल्याचा दावा केला आहे. तसेच युक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयीन संचालकांचे सल्लागार मिखाईल पोडोलियाक यांनी […]

जेलेन्स्की युक्रेनमध्येच, युक्रेनच्या संसदेचा दावा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी युक्रेन देश सोडल्याचा दावा रशियन माध्यमाने केला होता. मात्र, युक्रेनने रशियाचा दावा फेटाळून लावला आहे. जेलेन्स्की यांनी देश सोडला नसून ते कीवमध्ये असल्याचे युक्रेनच्या संसदेने सांगितले आहे.

युक्रेनने रशियाच्या दाव्याचे खंडन केले आहे. युक्रेनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की कीवमध्ये असल्याचा दावा केला आहे. तसेच युक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयीन संचालकांचे सल्लागार मिखाईल पोडोलियाक यांनी जेलेन्स्की कुठे आहेत हे सांगण्यास नकार दिला. ते म्हणाले, राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी, ते आता कुठे आहेत याची माहिती आम्ही जाहीर करणार नाही.

रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. तर युक्रेनही रशियाला जशास तसे उत्तर देत आहे. मात्र असे असताना, रशियन माध्यामे जेलेन्सकी यांनी देश सोडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रशियाचा दावा युक्रेनियन सैन्य आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची युद्धनीती आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number