Zeeshan Siddique: झिशान सिद्दीकी यांची विधानपरिषदेची आमदारकी धोक्यात? AB फॉर्मनरील ‘त्या’ सहीने एकच गदारोळ

सुनील तटकरे यांनी AB फॉर्मवर सही केल्याने झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती हाती आली आहे. 

Zeeshan Siddique: झिशान सिद्दीकी यांची विधानपरिषदेची आमदारकी धोक्यात? AB फॉर्मनरील ‘त्या’ सहीने एकच गदारोळ

एकीकडे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष नाहीत, अशी चर्चा सुरू असताना झिशान सिद्दीकी यांच्या AB फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे यांची सही केली होती. सुनील तटकरे यांनी AB फॉर्मवर सही केल्याने झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती हाती आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने देण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नाही. त्यामुळे 30 एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांच्या AB फॉर्मवर सुनील तटकरे यांनी केलेल्या सहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात पक्षाकडून पाठवण्यात येत असलेला हा पत्र व्यवहार अंतिम आहे असं समजावा असा देखील उल्लेख केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number