युविकाने सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा पती प्रिन्स नरुला आपले केस कापून घेताना दिसून येत असून, अंगावर कापड घेऊन बसला आहे. तर, युविका ही घरात फिरून एक व्हिडीओ बनवत आहे. व्हिडीओ बनवताना युविका म्हणते की, ‘जेव्हा जेव्हा मी व्लॉग बनवते, तेव्हा मी येऊन ‘भंगी’ सारखी का उभी राहते? मला स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. मी खूप बेकार दिसत आहे आणि प्रिन्स मला तयार होण्यास वेळ देत नाही.’ युविकाचा हा व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर तिला अटक करण्याची मागणी होत आहे. #ArestrestYuvikaChoudhary सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यापुर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बबिता जी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने हाचं जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरला होता. यानंतर तिच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी झाली होती. त्यानंतर तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. नंतर मूनमूनने यासंदर्भात मुनमुनने ट्विटरद्वारे माफी मागितली होती.
आता युविकाने देखील इंस्टाग्राम आणि टि्वटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे. तिने पोस्टमध्ये लिहलं आहे. नमस्कार, मित्रांनो माझ्या व्लॉगकमध्ये मी ज्या शब्दाचा वापर केला त्या शब्दाचा अर्थ मला माहित नाही. माझा हेतू कोणाला दुखविण्याचा नव्हता आणि मी कोणाला दुखविण्यासाठी असं करू शकत नाही. मी सर्वांना माफी मागते. मी आशा करते की तुम्ही मला समजून घ्याल. लव यू ऑल. आता युविकावर कारवाई होईल का ? हे येणार काळातचं कळेलं.