मुंबई : मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे बोगस पोलिंग एजंट बसवल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. युवासेनेने निवडणूक प्रक्रियेत घोळ केला असल्याचे अधिसभा मतमोजणी दरम्यान अभाविपकडून सांगितले आहे.