कडकनाथ कोंबडी घोटाळा : तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कडकनाथ कोंबडी घोटाळा (Kadaknath poultry scam) प्रकरणात आता एका तरूण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्यामुळे कोल्हापूर हादरलं आहे. पन्हाळा तालुक्यातील माले गावात राहणाऱ्या प्रमोद जमदाडे या 25 वर्षीय तरुण शेतकऱ्यावर कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामुळे आत्महत्येची वेळ आली. या शेतकऱ्याने रयत ऍग्रोच्या (Rayat Agro) गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. मुंबईमधील आंदोलनातही तो सहभागी झाला […]

कडकनाथ कोंबडी घोटाळा : तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कडकनाथ कोंबडी घोटाळा (Kadaknath poultry scam) प्रकरणात आता एका तरूण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्यामुळे कोल्हापूर हादरलं आहे. पन्हाळा तालुक्यातील माले गावात राहणाऱ्या प्रमोद जमदाडे या 25 वर्षीय तरुण शेतकऱ्यावर कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामुळे आत्महत्येची वेळ आली. या शेतकऱ्याने रयत ऍग्रोच्या (Rayat Agro) गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. मुंबईमधील आंदोलनातही तो सहभागी झाला होता. तसंच पन्हाळ्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या लढ्याचं नेतृत्व करत होता.

काय घडलं नेमकं?

प्रमोद जमदाडे या युवकाने रयत ऍग्रोच्या कडकनाथ कोंबडी प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली होती.

अल्पकाळात जास्त लाभ होणार या विचाराने त्याने कुटुंबीयांकडून पैसे घेऊन या प्रकल्पात गुंतवणूक केली होती.

मात्र या तरुणाचे पाच लाख या प्रकल्पात बुडाले.

त्यानंतर कुटुंबियांच्या टोमण्यांमुळे बेजार होऊन प्रमोदने 18 जानेवारी रोजी विषप्राशन केलं.

प्रमोदला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्रर उपचाऱ्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूचे बातमी कळताचं रयत मध्ये गुंतवणूक केलेले अनेक गुंतवणूकदार आणि प्रमोदचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले.

गुंतवणूकदारांनी रयत प्रमुख माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

रयत संस्थेचे प्रमुख सागर सदाभाऊ खोत यांनी याप्रकरणी तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी आज कोल्हापूरात जमदाडे यांच्या आत्महत्येनंतर केली. शिवाय अनेक गुंतवणूकदारांनी सुद्धा याप्रकरणावर लवकारत लवकर चौकशी व्हावी अशी कडकडीने विनंती केली असून त्यांच्याकडून या सर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number