उन्हाळ्याच्या दिवसात आपण सहसा घरी जेवणात आणि जेवणानंतर दही,ताक,लस्सी या थंडावा देणाऱ्या पदार्थांचा समावेश करत असतो. यातही दह्यामुळे आपल्या जेवणाला एक वेगळीच चव येते आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. परंतु बर्याच वेळा बाजारात मिळणाऱ्या दह्यात भेसळ केलेली असते. त्यामुळे घरच्या घरी दही बनवणे अधिक उत्तम, ते कसे बनवायचे पाहूया-
-आंबट दह्याचा वापर करा
घरच्या घरी दही बनवण्यासाठी आंबट दह्याचा वापर करा. त्यामुळे दही अधिक घट्ट होते. त्यासाठी दूध गरम करून घ्या. आता थोड्या गरम पाण्यात तुमच्याजवळील दही टाका. त्यानंतर दुधाला ७-८ तासांसाठी झाकून ठेवा. मग तुम्हाला अधिक घट्ट दही मिळेल.
-दुधाची पावडर
घट्ट दही मिळवण्यासाठी तुम्ही फुल क्रिम दुधाचा वापर करु शकता. फुल क्रिम दूध उकळवताना यामध्ये थोडीशी मिल्क पावडर टाका. यामुळे दूध घट्ट होईल आणि दहीसुद्धा जाड होईल.
-व्यवस्थितीत उकळा
घरच्या घरी दही बनवण्यासाठी ते व्यवस्थितीत उकळवणे महत्त्वाचे असते. यासाठी दूधाला २०० डिग्री फॅरेनहाइटवर जवळजवळ २० मिनिटांपर्यंत उकळवावे. जर दूध जास्त प्रमाणात असेल तर ते खुप वेळ उकळवा. त्यानंतर दूध थोडं हलकेसे कोमट झाल्यानंतर त्याचा दही बनवण्यासाठिवतोपार करावा.
-दूध थंड करा
बऱ्याच वेळा दही बनवताना आपण गरम दूधातच दही तयार करतो. परंतु दूध उकळल्यानंतर ते नीट थंड करुन घेतल्याने दही उत्तम आणि स्वादिष्ट होते.
-योग्य भांड घ्या
दूध उकळलेल्या भांड्यात दही लावू नये. तसे न केल्यास ते अधिक घट्ट होत नाही. दूध उकळल्यानंतर दुसऱ्या भांड्यात आंबट दही टाकून ते दही करण्यासाठी लावावे.