Yogi Adityanath: घुसखोरांवर योगींचा कडक इशारा! प्रत्येक जिल्ह्यात डिटेंशन सेंटर उभारण्याचे आदेश

प्रत्येक जिल्ह्यात तात्पुरते डिटेंशन सेंटर उभारण्याचे निर्देश देत घुसखोरांना पडताळणी पूर्ण होईपर्यंत तिथे ठेवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

Yogi Adityanath: घुसखोरांवर योगींचा कडक इशारा! प्रत्येक जिल्ह्यात डिटेंशन सेंटर उभारण्याचे आदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व जिलाधिकाऱ्यांना परदेशी अवैध घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एका अधिकृत निवेदनातून ही माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की राज्याची कायदा-सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सलोखा हे सर्वोच्च प्राधान्य असून कोणतीही अवैध हालचाल सहन केली जाणार नाही.

मुख्यमंत्रींच्या सूचनांनुसार प्रत्येक जिल्हा प्रशासनाने आपल्या क्षेत्रातील घुसखोरांची ओळख निश्चित करून त्यांच्या विरोधात नियमानुसार पावले उचलावीत. यासोबतच त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात अस्थायी डिटेंशन सेंटर उभारण्याचे आदेशही दिले आहेत. या केंद्रांमध्ये विदेशी नागरिकत्व असलेले अवैध प्रवासी ठेवले जाणार असून त्यांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत त्यांना तिथेच तात्पुरता निवारा दिला जाईल.

हेही वाचा: Rishabh Pant Angry On Kuldeep: 'तु घरी खेळतोयस का?' गुवाहाटी कसोटीत ऋषभ पंतचा कुलदीपवर संताप

योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की डिटेंशन सेंटरमध्ये ठेवलेल्या घुसखोरांना ठरलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जाईल. उत्तर प्रदेशची नेपाळसोबत उघडी सीमा असल्याने दोन्ही देशांच्या नागरिकांना मुक्तपणे प्रवासाची मुभा आहे, परंतु इतर देशांतील लोकांवर कडक तपास लागू आहे.

याआधी 3 नोव्हेंबर रोजी बिहारमधील एका निवडणूक सभेत त्यांनी दावा केला होता की, जर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत परत आली, तर राज्यातील घुसखोरांना हाकलून देण्यात येईल आणि त्यांची मालमत्ता गरीबांमध्ये वाटप करण्याचे काम केले जाईल. योगी आदित्यनाथ यांच्या या कठोर भूमिकेमुळे राज्यातील सुरक्षाविषयक प्रक्रियांना आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Sheikh Hasina: ढाका आंदोलनाने पेटलं! शेख हसीनांच्या फाशीसाठी जोरदार घोषणाबाजी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number