Local Body Elections in Maharashtra: लग्नाआधी मतदान! येवला शहरातील नवरा-नवरीने दिला लोकशाहीचा आदर्श संदेश

येवला शहरात मतदानाच्या पहिल्या दिवशी लग्नाच्या वेशात नवरा-नवरीने मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत त्यांनी लोकशाहीला प्राधान्य दिले.

Local Body Elections in Maharashtra: लग्नाआधी मतदान! येवला शहरातील नवरा-नवरीने दिला लोकशाहीचा आदर्श संदेश

येवला शहरात आज मतदानाच्या दिवशी एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. लग्नाकरिता सजलेल्या नवरा-नवरीने बहुल्यावर चढण्यापूर्वी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. लग्नाच्या वेशभूषेतच केंद्रावर पोहोचलेल्या या जोडप्याने आदर्श नागरिकत्वाचे उत्तम उदाहरण घालून दिले असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

येवल्यात सकाळपासूनच मतदान प्रक्रिया कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली आहे. शहरातील 13 प्रभागांसाठी आज मतदान होत असून एक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची निवड होणार आहे. एकूण 40,903 मतदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा: Local Body Election in Maharashtra Election : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुक मतमोजणीचा निकाल 21 डिसेंबरला? न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष

अशा पार्श्वभूमीवर, लग्नाच्या अगदी आधी नवरा आणि नवरीने मतदान केंद्रावर जाऊन आपला लोकशाही हक्क बजावला. सामाजिक जाणीव जपणाऱ्या या कृतीमुळे मतदानाला प्रोत्साहन मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. जय महाराष्ट्र न्यूजसोबत बोलताना नवरा-नवरी म्हणाले, “आम्ही आधी मतदान करून नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आणि नंतरच लग्नाच्या सात फेऱ्या घेणार आहोत.” त्यांच्या या भूमिकेमुळे तरुण मतदारांमध्येही सकारात्मक संदेश गेल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांतही आज सकाळपासून मतदान उत्साहात सुरू असून मतदार मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत. लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी मतदारांची ही सक्रियता महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: Share Market Update : शेअर मार्केटची सुरुवात लालेलाल; सेन्सेक्स 170 अंकांनी घसरला, तर निफ्टी 26,145 च्या खाली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number