जिल्ह्यात 52 नव्याने पॉझेटिव्ह ; 38 कोरानामुक्त

यवतमाळ, दि. 17 : यवतमाळ जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 38 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर 24 तासात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 183 रिपोर्ट प्राप्त झाले. […]

जिल्ह्यात 52 नव्याने पॉझेटिव्ह ; 38 कोरानामुक्त

यवतमाळ, दि. 17 : यवतमाळ जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 38 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर 24 तासात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 183 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 131 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 299 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10808 झाली आहे. 24 तासात 38 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 10101 असून आतापर्यंत 357 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 97285 नमुने पाठविले असून यापैकी 96986 प्राप्त तर 229 अप्राप्त आहेत. तसेच 86248 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number