यवतमाळ जिल्ह्यात 55 जण कोरोनामुक्त ; 10 नव्याने पॉझेटिव्ह एक चा मृत्यू

यवतमाळ, दि. 16 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 55 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात 10 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये बाभुळगाव शहरातील 66 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. […]

यवतमाळ जिल्ह्यात 55 जण कोरोनामुक्त ; 10 नव्याने पॉझेटिव्ह एक चा मृत्यू

यवतमाळ, दि. 16 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 55 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात 10 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला.

मृतकामध्ये बाभुळगाव शहरातील 66 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 31 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 10 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 21 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 296 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10756 झाली आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 10063 असून आतापर्यंत 357 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 97042 नमुने पाठविले असून यापैकी 96873 प्राप्त तर 169 अप्राप्त आहेत. तसेच 86117 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number