यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह तर एकाचा मृत्यु…

यवतमाळ, दि. 5 : जिल्ह्यात 24 तासात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 21 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर अमरावती येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झाला जिल्हा परिषदेच्या […]

यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह तर एकाचा मृत्यु…

यवतमाळ, दि. 5 : जिल्ह्यात 24 तासात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 21 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर अमरावती येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झाला

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 5) एकूण 163 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 130 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 378 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12889 झाली आहे. 24 तासात 21 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12107 आहे. तर जिल्ह्यात एकूण 404 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 126691 नमुने पाठविले असून यापैकी 126029 प्राप्त तर 662 अप्राप्त आहेत. तसेच 113140 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number