यवतमाळ जिल्ह्यात 167 पॉझेटिव्ह, 507 कोरोनामुक्त, 12 मृत्यु

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5469 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 167 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5302 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2532 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1275 तर गृह विलगीकरणात 1257 रुग्ण आहेत.तर जिल्ह्यात एकूण 1733 मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये दिग्रस तालुक्यातील 65 […]

यवतमाळ जिल्ह्यात 167 पॉझेटिव्ह, 507 कोरोनामुक्त,  12 मृत्यु

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5469 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 167 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5302 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2532 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1275 तर गृह विलगीकरणात 1257 रुग्ण आहेत.तर जिल्ह्यात एकूण 1733 मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये दिग्रस तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 63 वर्षीय महिला, बाभुळगाव येथील 40 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष आणि आर्णि 65 पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत झालेल्यांमध्ये उमरखेड तालुक्यातील 50 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 75 वर्षीय महिला, तर खाजगी रुग्णालयात बाभुळगाव तालुक्यातील 87 वर्षीय पुरुष, महागाव येथील 78 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 72 वर्षीय पुरुष आणि पांढकरवडा येथील 34 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला. मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 167 जणांमध्ये 105 पुरुष आणि 62 महिला आहेत. यात आर्णी येथील 6, बाभुळगाव येथील 3, दारव्हा येथील 4, दिग्रस येथील 14, घाटंजी येथील 8, कळंब येथील 6, महागाव येथील 6, मारेगाव येथील 31, नेर येथील 7, पुसद येथील 17, राळेगाव 3, उमरखेड 5, वणी येथील 15, यवतमाळ 24, झरीजामणी 15 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number