नवी दिल्ली : यास चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुर्ण तयारीत आहे नुकतीच मोदी यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा रविवारी घेतला होत . अतिजोखमीच्या भागांतील लोकांचे स्थलांतर सुरक्षितरित्या व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी राज्यांसोबत समन्वयाने काम करावे, वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आल्यास तो कालावधी कमी ठेवावा, संपर्काचे जाळे कमी वेळेपुरते बंद ठेवावे आणि ते वेगाने पूर्ववत करावे, असे मोदी यांनी म्हटल्याचे पंतप्रधान कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे. पुढील २ दिवस अत्यंत भारी असणार आहे कारण मिळाल्या माहितीनुसार मध्य पूर्व भागात बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ तयार झाले आहे. तसेच पुढच्या २४ तासात या वादळाचे रुपांतर फार तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यास चक्रीवादळ हे बुधवारी पुर्व किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे रेल्वे गाड्या देखील रद्द केल्या आहेत. तसेच या वादळाचे रौद्र अवतार या २४ तासात बघण्यास मिळेलं असे म्हटल्या जातं आहे.
अधिकाऱ्यांना निर्देश : किनाऱ्यांवरील लोक आणि उद्योग करणाऱ्यांना या कामात सहभागी करून घ्यावे, अशी सुचना ही मोदींनी अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने यास चक्रीवादळ २६ मेच्या सायंकाळी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओदिशाचे किनारे ओलांडण्याची अपेक्षा आहे, असं सांगितलं आहे.
देशभरातून एनडीआरएफचे जवान किनारी भागात तैनात केले :
एनडीआरएफने आपल्या सुमारे ९५० जवानांना देशातील विविध ठिकाणांहून एअरलिफ्ट करुन, बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात तैनात केले आहे. याठिकाणी २६ हेलिकॉप्टरही स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले आहेत. जामनगर, वाराणसी, पटना आणि अराकोन्नमहून कोलकाता, भुवनेश्वर आणि पोर्ट ब्लेअरमध्ये सुमारे ७० टन साहित्य आणण्यात आले असल्याची माहितीही लष्कराने दिली. सुमारे ८००हून अधिक ओडीआरएएफ कर्मचारी टॉवर , जेसीबी, हायड्रा क्रेन्स,लाईट, सर्च लाईट, जेनसेट्स, इन्फ्लेटेबल बोट्स, हायड्रॉलिक ट्री कटर्स, गॅस कटर्स, प्लाज्मा कटर्स, सॅटेलाईट फोन्स आणि वॉकीटॉकी अशा साहित्यासह येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती लष्कराने दिली.