WPL 2026: आज मैदानात उतरणार RCB; मुंबईच्या तगड्या संघासमोर स्मृतीची सेना टिकणार का?

मेगा लिलावानंतरचा हा पहिला हंगाम असल्याने संघरचनेतील फरक प्रकर्षाने जाणवतो. मुंबई इंडियन्सने सातत्यावर भर देत विजेतेपद मिळवून देणाऱ्या कोअर संघावरच विश्वास ठेवला आहे.

WPL 2026: आज मैदानात उतरणार RCB; मुंबईच्या तगड्या संघासमोर स्मृतीची सेना टिकणार का?

मुंबई: महिलांच्या क्रिकेटमधील सर्वात रंगतदार स्पर्धेचा नवा हंगाम आजपासून सुरू होत असून, WPL 2026 चा थरारक श्रीगणेशा सध्याच्या विजेत्या Mumbai Indians Women आणि माजी विजेत्या Royal Challengers Bengaluru Women यांच्यातील महामुकाबल्याने होणार आहे. लीगच्या अल्प पण प्रभावी इतिहासातील हे दोन्हीच संघ विजेते ठरलेले असल्याने, पहिल्याच सामन्यात संपूर्ण हंगामाची दिशा ठरवणारी लढत पाहायला मिळणार आहे.

भारताच्या अलीकडील एकदिवसीय विश्वचषक विजयाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आहे. अशा वेळी WPL 2026 चा सलामी सामना हा केवळ एक क्रिकेट सामना न राहता, महिलांच्या क्रिकेटसाठी नवे उंच शिखर गाठण्याची संधी मानला जात आहे. अनुभवी स्टार खेळाडूंवर अपेक्षांचा भार असणारच, पण तरुण आणि नवोदित खेळाडूंना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी याहून मोठी संधी मिळणे कठीण आहे.

मेगा लिलावानंतरचा हा पहिला हंगाम असल्याने संघरचनेतील फरक प्रकर्षाने जाणवतो. मुंबई इंडियन्सने सातत्यावर भर देत विजेतेपद मिळवून देणाऱ्या कोअर संघावरच विश्वास ठेवला आहे. हरमनप्रीत कौर, नॅट स्किव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज आणि अमेलिया केर यांच्याभोवती उभा असलेला हा संघ अनुभव, संतुलन आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसतो.

हेही वाचा: Fixed Deposit Online: घरबसल्या करा FD आणि मिळवा निश्चित परतावा; Amazon Pay ची नवी गुंतवणूक सेवा

दुसरीकडे, RCB महिला संघ नव्या रूपात मैदानात उतरत आहे. एलिस पेरी, रेणुका सिंग ठाकूर आणि आशा शोभना यांच्या अनुपस्थितीमुळे संघरचनेत मोठा बदल झाला आहे. कर्णधार स्मृती मंधाना हिने लिलावापूर्वीच पेरी उपलब्ध नसल्याची माहिती असल्याने रणनीती आखणे सोपे गेले, असे स्पष्ट केले. आता जॉर्जिया व्होल, ग्रेेस हॅरिस, नादिन डी क्लर्क आणि विकेटकीपर रिचा घोष यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

हवामान आणि खेळपट्टी दोन्हीही सामन्यासाठी अनुकूल आहेत. पावसाचा कोणताही अडथळा नसून, संध्याकाळनंतर दव पडण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार येथे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतो, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.

एकीकडे मुंबई इंडियन्सचा स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण संघ, तर दुसरीकडे नव्या दमाच्या खेळाडूंनी सजलेली RCB या टक्करमुळे WPL 2026 ची सुरुवातच प्रेक्षकांसाठी “ब्लॉकबस्टर” ठरणार आहे. महिलांच्या क्रिकेटमधील पुढील पर्वाची नांदी या सामन्यातूनच होणार, हे नक्की.

हेही वाचा: Crime News: धर्माच्या नावावर बँकांनाही चुना! बीडमध्ये 'गुलजार-ए-रझा' ट्रस्टचा कोट्यवधींचा स्कॅम उघड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number