भारतीय आयटी क्षेत्रासाठी आजची सकाळ ब्लॅक वेन्सडे ठरली आहे. एका कंपनीने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच देशात बेरोजगाची संख्या वाढली असताना एका आयटी कंपनीतील तब्बल 30 हजार कर्मचाऱ्यांना कंपनीकडून नारळ देण्यात आलं आहे. जागतिक दर्जावर असलेल्या ओरॅकल या कंपनीने त्यांच्या कंपनीतील 18 टक्के म्हणजेच 30 हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नोकरीवरून काढून टाकलं, या धक्कादायक कपातीत भारताचा आकडा सर्वाधिक असून, देशातील सुमारे 12 हजार आयटी प्रोफेशनल्सनी आपली नोकरी गमावली आहे.
हेही वाचा- Stock Market Today: निफ्टी 23000 च्या उंबरठ्यावर! सेन्सेक्सची 1814 अंकांची 'जायंट लीप'; भारतीय शेअर बाजार पुन्हा सुस्साट
तर झालं असं की, सकाळी 5 ते 6 च्या सुमारास कर्मचाऱ्यांना 'ओरॅकल लीडरशिप'कडून एक ईमेल आला. "तुमची जागा आता कंपनीत redundant झाली आहे," असं त्या मेलमध्ये सांगण्यात आलं. आधी सर्व कर्मचाऱ्यांना वाटलं आज 1 एप्रिल आहे त्यामुळे आपल्यासोबत एखादा प्रॅंक होत असेल मात्र मेल आल्यानंतर अवघ्या काही सेकंदात कर्मचाऱ्यांचे लॅपटॉप एक्सेस आणि इंटरनल सिस्टिम्स बंद झाले. रात्रंदिवस मेहनत करून कंपनीला आपला वेळ देऊनही त्यांना हे फळ मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आधीच नोकऱ्या मिळत नाहीत त्यामध्ये आहे ती नोकरी गेल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आभाळ कोसळावं अशी परिस्थिती निर्माण झाली. यावर कंपनीकडून निवेदनात सांगण्यात आले की, ऑपरेशन्स स्ट्रीमलाईन करण्यासाठी आणि बदलत्या गरजेनुसार हा निर्णय घ्यावा लागला. तर दुसरीकडे ओरॅकल सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे एआयमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना महिनाअखेरीस नोकरीवरून काढल.
हेही वाचा- Jet Fuel Rate: पश्चिम आशियातील युद्धाचा इंधनावर मोठा परिणाम; विमान प्रवास महागणार?
'ब्लाइंड' आणि 'रेडिट' सारख्या प्लॅटफॉर्मवर कर्मचाऱ्यांनी आणि एका मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, माझ्या 20 जणांच्या टीमपैकी 6 जणांना पहाटेच मेल आला. कुणाची शिफ्ट सुरू झाली होती, तर कुणाची व्हायची होती, सकाळी सकाळी एक मेल आणि आणि जे शिफ्टला होते त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एक दोन नाही, तब्बल 30 हजार कर्मचाऱ्यांना एक झटक्यात आयटी कंपनीने नारळ दिला होता. भारतात ओरॅकलचे सुमारे 30 हजार कर्मचारी आहेत, त्यापैकी जवळपास 40 टक्के म्हणजेच 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं आहे. मात्र या कंपनीची कर्मचारी कपातीची पद्धत अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी होती.