महिलेच्या घटस्फोटाचे फोटोशूट चर्चेत

मुंबई, 3 मे २०२३, प्रतिनिधी :सर्वांनाच फोटो, व्हिडिओ काढण्याची हौस असते. प्रत्येक आनंद क्षण हा कॅमेरामध्ये टिपला जातो. आणि हे फोटो आयुष्यभरासाठी आठवणींचा साठा म्हणून राहतात. सध्याच्या घडीला प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचे फोटो काढले जातात. लग्नाचे आधीचे जोडप्याचे फोटो (प्री-वेडिंग शूट), बेबी बंप फोटोशूट, अशा अनेक प्रकारचं फोटोशूट केलं जातं. पण, सध्या एका आगळ्यावेगळ्या फोटोशूटची चर्चा […]

महिलेच्या घटस्फोटाचे फोटोशूट चर्चेत

मुंबई, 3 मे २०२३, प्रतिनिधी :सर्वांनाच फोटो, व्हिडिओ काढण्याची हौस असते. प्रत्येक आनंद क्षण हा कॅमेरामध्ये टिपला जातो. आणि हे फोटो आयुष्यभरासाठी आठवणींचा साठा म्हणून राहतात. सध्याच्या घडीला प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचे फोटो काढले जातात. लग्नाचे आधीचे जोडप्याचे फोटो (प्री-वेडिंग शूट), बेबी बंप फोटोशूट, अशा अनेक प्रकारचं फोटोशूट केलं जातं. पण, सध्या एका आगळ्यावेगळ्या फोटोशूटची चर्चा समाजमाध्यमावर सुरू आहे. ज्याची तुम्ही कल्पनादेखील करु शकत नाही. एका महिलेने चक्क आपल्या पतीपासून काडीमोड झाल्याचे (घटस्फोट) घेतल्याचे फोटोशूट केल आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे ती महिला या फोटोमध्ये आनंदात दिसत असून हे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.महिलेच्या अनोख्या फोटोशूटची समाज माध्यमावर जोरदार चर्चा सुरु असून अनेकजण हे अनोखं फोटोशूट पाहून थक्क झाले आहेत. संबंधित महिला कोण आहे?, ती काय करते?, ती कुठे राहते? हे अद्याप कळलं नाही. समाज माध्यमावर फोटोज शेअर केलेल्या महिलेने लाल रंगाचा गाउन घातला असून तिच्या हातात मद्यपेयाची बाटली दिसत आहे. तर, दुसर्‍या हातात एक पोस्टर देखील आहे, ज्यामध्ये इंग्रजीमध्ये लिहिले आहे की, ‘मला 99 समस्या आहेत, परंतु पती नाही.’ तर, ती महिला आनंदाने तिच्या लग्नाचा फोटो देखील फाडत असल्याचं दिसून आहे.

दरम्यान, एका आठवड्यापूर्वी अमेरिकेत आणखी एका महिलेने घटस्फोट घेतल्याचा आनंद साजरा केला होता आणि फोटोशूट केले होते. त्या, महिलेने तिच्या लग्नाचे कपडे जाळले आणि सांगितले की हा तिने आतापर्यंत घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयांपैकी एक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number