Eknath Shinde Operation Tiger : मोठी बातमी! ठाकरेंचे खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार शिंदेंच्या भेटीला

महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हिंगोलीच्या राजकारणात नवं वादळ येण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Operation Tiger : मोठी बातमी! ठाकरेंचे खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार शिंदेंच्या भेटीला

ठाकरेंचे अनेक नेतेमंडळींनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात पकड्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. अशातच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हिंगोलीच्या राजकारणात नवं वादळ येण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरेसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत त्यामुळे ऑपरेशन टायगरची हवा पुन्हा पाहायला मिळत आहे. मुंबईतील नंदनवन या बंगल्यावर आष्टीकरांनी शिंदेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- BMC News : मुंबई महापालिकेबाबत माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड; नगरसेवकांच्या निवडीला कोर्टात आव्हान, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान आष्टीकरांच्या भेटीनंतर ठाकरेंचे 6 खासदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी ठाकरेंचे 8 खासदार फुटणार असल्याचा दावा करण्यात येत होता. परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधव, मुंबईतील ठाकरेंचे खासदार संजय पाटील हे देखील शिंदेसेनेत जाण्याच्या वळणावर असल्याचं म्हटलं जात होत. त्यानंतर आता ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर नवं राजकीय वादळ येण्याची शक्यता वर्तावली जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number