Shashikant Shinde: उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार? शशिकांत शिंदेंनी महाविकास आघाडीच्या रणनीतीबाबत दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

राज्यसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मित्रपक्षांनी ज्येष्ठतेचा मान राखला, त्याचप्रमाणे विधान परिषदेबाबतही महाविकास आघाडी एकत्रितपणे निर्णय घेईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.<br/>

Shashikant Shinde: उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार? शशिकांत शिंदेंनी महाविकास आघाडीच्या रणनीतीबाबत दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

Shashikant Shinde: महाराष्ट्र राजकारणात सध्या आगामी विधान परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का, या चर्चांना उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या आगामी भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मित्रपक्षांनी ज्येष्ठतेचा मान राखला, त्याचप्रमाणे विधान परिषदेबाबतही महाविकास आघाडी एकत्रितपणे निर्णय घेईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

राज्यसभेतील सहकार्याबद्दल मित्रपक्षांचे मानले आभार
शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यसभेला महाविकास आघाडीकडे संख्याबळ कमी असतानाही मित्रपक्षांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठतेचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना पुढाकार घेण्याची संधी दिली. याबद्दल त्यांनी सर्व मित्रपक्षांचे आभार मानले. “भविष्यकाळात जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विशेषतः आता विधान परिषदेची निवडणूक समोर आहे, त्या संदर्भातही आम्ही सर्वजण एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ,” असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत एकमत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सभागृहात चर्चा टाळली जात असल्याचा गंभीर आरोप
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी विधीमंडळाच्या कामकाजावरही नाराजी व्यक्त केली. “मी गेल्या 2 दिवसांपूर्वी आणि मागच्या आठवड्यात काही महत्त्वाचे विषय मांडले होते. सभापतींनी गुरुवारी किंवा शुक्रवारी त्यावर चर्चा लावण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज सोमवारीही चर्चेच्या क्रमात तो विषय दिसला नाही,” असे त्यांनी नमूद केले. जनतेला सत्य माहिती मिळावी आणि न्याय मिळावा यासाठी जेव्हा आम्ही आयुधांचा वापर करतो, तेव्हा अशा प्रकारे टाळाटाळ का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारची या विषयावर नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आपण सभागृहात हा विषय लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Raj Thckeray : मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात, राज ठाकरे यांचं आवाहन, काय म्हणाले?

महाविकास आघाडीची ‘एकजूट’ कायम राहणार?
आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कशा पद्धतीने पुढे जाणार, या प्रश्नावर उत्तर देताना शशिकांत शिंदे यांनी ‘एकजुटीचा’ मंत्र जपला. राज्यसभेच्या अनुभवातून महाविकास आघाडी अधिक भक्कम झाली असून, विधान परिषदेच्या जागेसाठी कोणाची वर्णी लावायची, याचा पेच एकत्रित चर्चेतून सोडवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार की महाविकास आघाडी नवा चेहरा देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number