यंदा तरी उद्धव यांना कळेल का अर्थसंकल्प ? 

यंदा तरी उद्धव यांना कळेल का अर्थसंकल्प ? या आशयाचे ट्विट एका ट्विटर वापरकर्त्याकडून करण्यात आले आहे.

यंदा तरी उद्धव यांना कळेल का अर्थसंकल्प ? 

२३ जुलै, २०२४ मुंबई : यंदा तरी उद्धव यांना कळेल का अर्थसंकल्प ? या आशयाचे ट्विट एका ट्विटर वापरकर्त्याकडून करण्यात आले आहे. शिउबाठाचे उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी ‘मला अर्थसंकल्पातलं काही कळतं नाही’, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, या वक्तव्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या. निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी, २३ जुलै रोजी, २०२४-२५ वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या मागच्या वक्तव्यावर समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. 
प्रतीक करपे या ट्विटर वापरकर्त्याने, ‘काय @OfficeofUT तुमच्यासाठी माननीय @Dev_Fadnavis जी यांनी खास “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” पुस्तक लिहिले, एकदा वाचले असते तर या वर्षीतरी बजेट कळाले असते’, असे मिश्किल ट्विट केले आहे. तरी या ट्विटवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

'कान्स'च्या रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीचा अस्सल मराठी ठसका! फोटो पाहिलात का?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number