लग्नासाठीचे मुलींचे किमान वय वाढणार?

लग्नासाठीचे मुलीचे किमान वय वाढवण्याच्या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. मुलीचे लग्नाचे किमान वय सध्या १८ वर्ष आहे. त्यामुळे आता मुलीचे लग्नाचे वय वाढवून २१ करण्याच्या विचारात सरकार आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडेल जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कायद्यात बदल करण्यासाठी सुधारणा विधेयकाला बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली […]

लग्नासाठीचे मुलींचे किमान वय वाढणार?

लग्नासाठीचे मुलीचे किमान वय वाढवण्याच्या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. मुलीचे लग्नाचे किमान वय सध्या १८ वर्ष आहे. त्यामुळे आता मुलीचे लग्नाचे वय वाढवून २१ करण्याच्या विचारात सरकार आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडेल जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कायद्यात बदल करण्यासाठी सुधारणा विधेयकाला बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

मुलींचे लग्न करण्याचे किमान वय १८ वर्ष आहे. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यासाठी या विधेयकाला कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुलींच्या लग्नासाठीच्या वयाबद्दल भाष्य केले. तसेच सद्यपरिस्थिती पाहता मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याबाबत विचार करायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

स्वातंत्र्य दिनी मुलीचे लग्नासाठीचे वय १८ वर्षावरून २१ करण्याच्या विचारात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच हे विधेयक आता सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number