रशिया-युक्रेन युद्धाचा आज एकोणीसावा दिवस असून रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, गोळीबार करत आहे. तर युक्रेनही रशियाला जशास तसे उत्तर देत आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आता दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे.
रशिया-युक्रेन या दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. सोमवारी १०.३० वाजता रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा होणार असल्याचे वृत्त युक्रेनेच्या शिष्टमंडळाच्या अधिकाऱ्यान दिले आहे.
युक्रेनची राजधानी कीव शहरावर ताबा मिळवण्यासाठी रशिया कीवच्या नागरीवस्तीवर क्षेपणास्त्र हल्ला करत आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात, गोळीबार युक्रेनचे अनेक नागरिक मरण पावले आहेत. तर युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. युक्रनने रशियावर केलेल्या हल्ल्यात रशियाचे अनेक लष्करी सैन्य मारले गेले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.