India Lockdown News: देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? इंधन टंचाईच्या चर्चांवर सरकारने सोडलं मौन; हरदीप सिंग पुरींनी स्पष्टच सांगितलं

इंधनाचे वाढते दर आणि आगामी आर्थिक टंचाईच्या पार्श्वभूमीवर 'देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?' अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

India Lockdown News: देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? इंधन टंचाईच्या चर्चांवर सरकारने सोडलं मौन; हरदीप सिंग पुरींनी स्पष्टच सांगितलं

India Lockdown News: मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट गडद झाले असून, त्याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. इंधनाचे वाढते दर आणि आगामी आर्थिक टंचाईच्या पार्श्वभूमीवर 'देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?' अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या सर्व अफवांना पूर्णविराम देत केंद्र सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका: पेट्रोलियम मंत्री
सीआयआय (CII) समिटमध्ये बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लॉकडाऊनच्या चर्चा फेटाळून लावल्या. "देशात लॉकडाऊन लागण्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. नागरिकांनी अशा चुकीच्या बातम्यांना थारा देऊ नये आणि अफवा पसरवणे थांबवावे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जागतिक तणावाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असला तरी, लॉकडाऊनसारखी स्थिती नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

इंधनाचा किती साठा शिल्लक?
इंधन दरवाढ आणि टंचाईच्या भीतीवर भाष्य करताना पुरी यांनी देशातील साठ्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताकडे सध्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे:

कच्चे तेल: पुढील 60 दिवस पुरेल इतका साठा.
LNG: सुमारे 60 दिवसांचा बॅकअप.
LPG (घरगुती गॅस): पुढील 45 दिवसांची तरतूद.

घरगुती गॅसचे उत्पादन वाढवले
युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा गॅस पुरवठा विस्कळीत होण्याची भीती होती. यापूर्वी भारताचा 60 टक्के गॅस याच मार्गाने येत असे. मात्र, संभाव्य टंचाई टाळण्यासाठी सरकारने देशांतर्गत उत्पादनावर भर दिला आहे. गॅसचे उत्पादन 36,000 MT वरून आता 54,000 MT पर्यंत वाढवण्यात आल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Indira Gandhi Appealed For Gold : 1967 मध्ये इंदिरा गांधींकडून सोनं खरेदी न करण्याचं आवाहन, व्हायरल फोटोमागील सत्य काय?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनावश्यक खर्च टाळून काटकसरीने वागण्याचे आणि सोन्यासारख्या वस्तूंची खरेदी काही काळ टाळण्याचे आवाहन केले आहे. ही एक प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number