PM Kisan Yojana : पीएम किसान योजने चा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात? जाणून घ्या नवं अपडेट

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत सध्या या योजनेचा 22 वा हप्ता कधी मिळणार? याकडे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

PM Kisan Yojana : पीएम किसान योजने चा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात? जाणून घ्या नवं अपडेट

राज्य सरकारसह केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा, महिलांचा, बालकांचा आणि सामान्यांचा विचार करून अनेक योजना अमलात आणल्या. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु करण्यात आलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार प्रत्यक्षात आणली. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मदत देण्यात येते. नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे.

हेही वाचा- BMC Home Lottery: महापालिकेच्या घरांसाठी दोन हजार अर्ज, पण 53 घरांना ‘नो रिस्पॉन्स’

या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी 3.70 लाख कोटींचा लाभ घेता आला आहे. या योजनेत सातत्याने तपासणी सुरू असल्यामुळे अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना योजनेतून बेदखल करता येतं. ही रक्कम शेतकऱ्यांना कृषी उत्पादनं, शिक्षण अथवा आरोग्यासाठी उपयोगी पडते. सध्या या योजनेचा 22 वा हप्ता कधी मिळणार? याकडे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- Land Property Rules: जमिनीचा हक्क सुरक्षित ठेवायचाय? मोजणी, नोंदी आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या

21 हप्त्यानंतर आता 22 वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे अजूनही ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तात्काळ ती पूर्ण करणे गरजेचे आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number