Pratap Sarnaik : "…तर दरवाढ करावी लागेल" डिझेल दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचे सूचक विधान

आज एसटीच्या इंधन पुरवठ्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

Pratap Sarnaik : &quot…तर दरवाढ करावी लागेल&quot डिझेल दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचे सूचक विधान

आधीच पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना फटका बसत असताना, आज चौथ्यांदा सीएनजीच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आज, 26 मे पासून सीएनजीचे दर प्रति किलो 2 रुपयांनी वाढून 83.09 रुपये झाले आहेत. यामुळे प्रवासी आणि वाहतूक व्यावसायिकांवरील खर्चात वाढ होणार आहे. 

अशातच आज एसटीच्या इंधन पुरवठ्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मंत्रालयातील परिवहन मंत्री यांच्या दालनात बैठक पार पडली असून सध्या राज्यात होत असलेल्या इंधन तुटवड्यासंबंधी आणि पेट्रोल-डिझेलसह सीएनजीमध्ये झालेल्या चौथ्या दरवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी एसटीला इंधन पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांसोबत करणार चर्चा असून तीन सरकारी तेल कंपन्या व दोन खाजगी कंपन्यांचे अधिकारी या चर्चेत उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यात डिझेल पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचं देखील सरनाईकांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा- CNG Price Increase : महागाईचा आणखी एक धक्का! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG च्याही दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांची चिंता वाढवली

दररोज 5 लिटर डिझेलची बचत करा- प्रताप सरनाईक
यावेळी प्रताप सरनाईक इंधन तुटवड्यावर म्हणाले की, "एसटी महामंडळाला चार कंपन्यांकडून डिझेल पुरवठा होतो. १० लाख ८७ हजार लीटर डिझेल लागते. हा पुरवठा थांबू नये, काही ठिकाणी पुरवठा कमी आहे. म्हणून या कंपन्यांना सूचना व विनंती केली आहे. एसटी महामंडळ ५५ लाख प्रवाशांना सेवा देते. प्रति लीटर नुकसान होत असले तरी महामंडळाचे नुकसान होणार नाही अशी मागणी केली आहे. त्यांनी ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्रत्येक आगारातून ५ लीटर बचत करण्याचे आवाहन केले आहे. त्यातून रोज १ हजार लीटर डिझेल बचत होईल. तातडीच्या सूचना चालकांना देण्यासाठी आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. वाहन चालकांचे योग्य समुपदेशन करायला सांगितले आहे. तसेच बसेसची योग्य देखरेख करायला सांगितले आहे. बचत करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन भत्ता व गौरव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जी आगार अधिक बचत करतील, त्यांनाही प्रोत्साहित केले दाईल."

"…तर दरवाढ करावी लागेल"- प्रताप सरनाईक
तसेच पुढे इंधन दरवाढीवर सरनाईक म्हणाले की, "डिझेल दरवाढ होत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. आजही दर स्थिर नाहित. सध्या तरी शासनाच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी करत आहोत. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर दरवाढ करावी लागेल. आम्ही डिझेलवरील कर कपातीची मागणी राज्य व केंद्राकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. तेल कंपनी आज सांगू शकत नाही. आता वाढ झाली आहे. आमच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे हे मात्र निश्चित आहे. काही प्रमाणात वाढ करून एसटी चालू ठेवावी लागेल."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number