‘पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणार’ – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. फडणवीसांना बजावलेल्या नोटिशीमुळे भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. मुंबई सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना ११ मार्च रोजी नोटीस बजावली असून बीकेसी येथे चौकशीसाठी बोलावले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पोलीस बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळ्यांबाबत सीबीआय चैकशी करतेय. मात्र ही माहिती […]

‘पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणार’ – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. फडणवीसांना बजावलेल्या नोटिशीमुळे भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. मुंबई सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना ११ मार्च रोजी नोटीस बजावली असून बीकेसी येथे चौकशीसाठी बोलावले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील पोलीस बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळ्यांबाबत सीबीआय चैकशी करतेय. मात्र ही माहिती सीबीआयकडे गेली तेव्हा मविआकडून हालचाली करण्यात आल्या. हा घोटाळा दाबण्यासाठी राज्य सरकारने एफआयआर दाखल केला. गोपनीय माहिती सार्वजनिक कशी झाली? असा एफआयआर दाखल करण्यात आला. मला काल पोलिसांनी नोटीस पाठवली असून उद्या ११ वाजता सायबर पोलीस स्थानकात चौकसीसाठी बोलावले आहे. त्यामुळे मी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणार आहे. पोलिसांना मी सहकार्य करणार असल्याचे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्वत:चा बचाव करण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर असत्य दावे करत असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत. ते म्हणाले, प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. प्रवीण चव्हाण सूडबुद्धीने वागत असल्याची अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे चव्हाणांच्या तक्रारीची शहनिशा करणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number