Maharashtra Municipal Elections 2026 : निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा! अर्ज सादर करण्याची पद्धत ऑफलाईन की ऑनलाईन; काय आहेत बदल?

महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन ठाण्यासह महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.

Maharashtra Municipal Elections 2026 : निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा! अर्ज सादर करण्याची पद्धत ऑफलाईन की ऑनलाईन; काय आहेत बदल?

नुकताच 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन ठाण्यासह महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकांमध्ये राज्यभरातील सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा- Maharashtra Municipal Elections 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर; जाणून घ्या निवडणुकीचं वेळापत्रक, खर्चाची मर्यादासंबंधी सविस्तर माहिती

दरम्यान महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जाणार असून त्या अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होणार आहे, तसेच 2 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. यादरम्यान यंदा निवडणुकीसाठीचा अर्ज ऑफलाईन घेणार की ऑनलाईन असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा- Viksit Bharat G RAM G Scheme: मनरेगा योजनेचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखली जाणार योजना

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार नामर्देशन पत्र ऑफलाईन पद्धतीने स्वीकारणार आहेत. तसेच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महत्त्वाची माहिती देत सांगितले की, जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवाराला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार असून सत्यप्रत किंवा त्यासंबंधी इतर पुरावा द्यावा लागणार आहे. त्याचसोबत सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचे हमी पत्र द्यावे लागणार आणि जर ते नाही दिले तर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. 

हेही वाचा- Jayant Patil : गोपीचंद पडळकरांमुळे देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात अबोला?, भेट घेणं टाळलं?; व्यासपीठावरील चित्र बोलकं

तर दुसरीकडे राज्यातील 29  महापालिकेच्या निवडणूकीबाबतची घोषणा करण्यात आली असून जालना आणि इचलकरंजी या 2 नव्याने स्थापन झालेल्या महापालिकांमध्येही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने, त्यामधील नावे वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यभरात एकूण 39,147 मतदान केंद्रे असतील. त्यापैकी केवळ मुंबईत 10,111 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी 11,349 कंट्रोल युनिट्स आणि सुमारे 22,000 बॅलेट युनिट्स वापरण्यात येणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number