Router Placement: Wi-Fi नीट चालत नाहीये? घरातल्या ‘या’ वस्तू राउटरजवळ ठेवू नका; जाणून घ्या

आजच्या डिजिटल युगात वेगवान इंटरनेट ही केवळ लक्झरी नाही तर एक मूलभूत गरज झाली आहे.

Router Placement: Wi-Fi नीट चालत नाहीये? घरातल्या ‘या’ वस्तू राउटरजवळ ठेवू नका; जाणून घ्या

Router Placement: आजच्या डिजिटल युगात वेगवान इंटरनेट ही केवळ लक्झरी नाही तर एक मूलभूत गरज झाली आहे. ऑनलाइन क्लासेस, वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉल्स, गेमिंग, ओटीटी स्ट्रीमिंग या सगळ्यासाठी इंटरनेटवरच अवलंबून राहावं लागतं. पण अनेकदा लोकांना तक्रार असते की Wi-Fi नीट चालत नाही किंवा स्पीड अचानक कमी होतो. आपल्याला वाटतं की ही समस्या इंटरनेट पुरवठादाराकडून (ISP) आहे, पण प्रत्यक्षात दोष आपल्या घरातील काही गोष्टींमध्ये दडलेला असतो.

Wi-Fi सिग्नल हे रेडिओ वेव्ह्जवर चालतात. या वेव्ह्जना अडथळे मिळाले तर सिग्नलची ताकद कमी होते आणि परिणामी इंटरनेट स्पीड घटतो. चला तर पाहूया, कोणत्या वस्तू राउटरजवळ ठेवल्याने नेटवर्कवर वाईट परिणाम होतो.

हेही वाचा:Michelin India: मिशेलिनकडून भारतात पहिला ‘मेड-इन-इंडिया’ पॅसेंजर कार टायर; चेन्नई प्लांटमधून उत्पादनास सुरुवात

जाड भिंती आणि मोठं फर्निचर

जर राउटर आणि मोबाईल-लॅपटॉपच्या मध्ये जाड भिंती, कपाटं किंवा मोठं फर्निचर असेल तर Wi-Fi सिग्नल कमकुवत होतो. विशेषतः काँक्रीटच्या किंवा लोखंडी भिंती सिग्नल सर्वात जास्त अडवतात. त्यामुळे राउटर नेहमी घराच्या मध्यभागी किंवा मोकळ्या जागेत ठेवावा.

मायक्रोवेव आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं

मायक्रोवेव ओव्हन हा 2.4 GHz फ्रिक्वेन्सीवर चालतो, जी Wi-Fi च्या बऱ्याच सिग्नल्सशी जुळते. त्यामुळे स्वयंपाकघरात किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जवळ राउटर ठेवला तर नेटवर्क स्लो होऊ शकतो.

पाणी: Wi-Fi चा मोठा शत्रू

पाण्यामुळे सिग्नल शोषला जातो. त्यामुळे राउटरच्या जवळ अक्वेरियम, मोठी पाण्याची ड्रमं किंवा कंटेनर असतील तर इंटरनेट स्लो होतो. पाण्याने भरलेल्या वस्तूंपासून राउटर दूर ठेवणे उत्तम.

हेही वाचा: Perplexity Comet Browser: Perplexity चा Comet ब्राउझर मोफत उपलब्ध; AI सहाय्यक सर्व वापरकर्त्यांसाठी खुला

धातू आणि आरसे

धातूचे फर्निचर किंवा स्टीलच्या वस्तू सिग्नल परावर्तित करतात तर आरसे सिग्नल कमकुवत करतात. जर राउटरच्या आजूबाजूला आरसा, धातूची आलमारी किंवा स्टीलचे सामान असेल तर नेटवर्कवर वाईट परिणाम होतो. म्हणून राउटरला धातूच्या पृष्ठभागावर ठेवणं टाळा.

ब्लूटूथ व वायरलेस गॅजेट्स

ब्लूटूथ हेडफोन्स, वायरलेस फोन किंवा इतर डिव्हाइसेस हे देखील 2.4 GHz आणि 5 GHz फ्रीक्वेन्सीवर चालतात. त्यामुळे ते Wi-Fi सिग्नलमध्ये अडथळा आणू शकतात.

काय करावं?

  • राउटर नेहमी घराच्या मध्यभागी व उंचावर ठेवा.

  • इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मायक्रोवेव, पाण्याच्या वस्तू आणि धातूपासून दूर ठेवा.

  • जाड भिंती किंवा फर्निचरच्या मागे राउटर ठेवू नका.

  • शक्य असेल तर ड्युअल बँड राउटर वापरा ज्यामुळे स्पीडवर कमी परिणाम होतो.

योग्य काळजी घेतली तर Wi-Fi नेहमी जलद चालेल आणि इंटरनेटचा अनुभव अधिक चांगला होईल.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number