लिव्ह-इन पार्टनरमुळे गरोदर, लग्नानंतरही एकत्र राहण्यास टाळाटाळ, अखेर पतीची हत्या!

लग्नानंतरही एकत्र राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या पतीचा संतापलेल्या पत्नीने चाकूने गळा चिरून हत्या केली आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरात सोमवारी पहाटे ही घटना घडली. महंतेश बिरादार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचं वय 28 वर्षं होतं. पोलिसांनी याप्रकरणी 24 वर्षीय पत्नीला अटक केली आहे. महंतेश आणि त्याची आरोपी पत्नी सांगली जिल्ह्यातील आहेत. 2016 पासून ते पुण्यात […]

लिव्ह-इन पार्टनरमुळे गरोदर, लग्नानंतरही एकत्र राहण्यास टाळाटाळ, अखेर पतीची हत्या!

लग्नानंतरही एकत्र राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या पतीचा संतापलेल्या पत्नीने चाकूने गळा चिरून हत्या केली आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरात सोमवारी पहाटे ही घटना घडली. महंतेश बिरादार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचं वय 28 वर्षं होतं. पोलिसांनी याप्रकरणी 24 वर्षीय पत्नीला अटक केली आहे.

महंतेश आणि त्याची आरोपी पत्नी सांगली जिल्ह्यातील आहेत.

2016 पासून ते पुण्यात राहतात.

आरोपी पत्नी एका नामांकित रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते, तर मयत पती एका खासगी कंपनीत कामाला होता.

नऱ्हेत भाड्याच्या घरात ते एकत्र राहत होते.

एकत्र राहत असताना दोघांमध्येही शरीरसंबंध आले होते.

यातून ती गरोदरही राहिली होती.

आरोपी महिलेने महंतेश बिरादार याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता.

पण तो लग्न करण्यासाठी टाळाटाळ करू लागला.

काही दिवसांपूर्वी तो पुणे सोडून निघूनही गेला होता.

त्यामुळे संतापलेल्या महिलेने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता.

याप्रकरणी महंतेश बिरादारला पोलिसांनी अटकही केली होती.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मयत महंतेश बिरादार याने आळंदीत जाऊन तिच्याशी लग्न केलं आणि पुन्हा ते एकत्र राहू लागले. यादरम्यान महंतेशने घटस्फोट घेण्यासाठी तिच्या मागे तगादा लावला. यावरून त्यांच्यात रोज भांडणं होऊ लागली.

सोमवारी मध्यरात्रीही त्यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात महंतेश याने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान रात्र झाल्यानंतर तो तसाच झोपी गेला. त्यानंतर जागी असलेल्या आरोपी पत्नीने चाकूने त्याचा गळा चिरला. स्वतःही गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तिने सिंहगड पोलीस ठाणे गाठत खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number