आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आई – वडीलानंतर ज्यांना आपण महत्वाचे स्थान देतो ते म्हणजे आपले गुरु. आपल्या जीवनाला दिशा देण्याचे काम हे आपले गुरु करतात. त्यामुळे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व दिले जाते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या मनातील गुरुजंनाबद्दलची आदराची भावना व्यक्त करतात. डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांनी राजकारणात आपली छाप सोडली आहे. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे त्य़ांनी भूषविली असली तरी शेवटपर्यत त्यांनी आदर्श शिक्षकाची ओळख जपली. त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून ओळखला जाऊ लागला.
शिक्षणक्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक अशा शिक्षकांच्या आदरार्थ हा दिवस साजरा केला जातो. 20 व्या शतकापासून हा दिवस साजरा करण्याची पंरपंरा सुरु आहे. भारतामध्ये 1962 मध्ये सर्वात आधी शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणुन जरी साजरा केला जात असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो.
5 सप्टेंबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो. अनेक शाळांमध्ये मोठ्या इयत्तेमधील विद्यार्थी शिक्षक होतात आणि लहान इयत्तेमधील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिकवतात. तर काही शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा दिवस साजरा केला जातो.
आई – वडिलांनतर आपल्याला घडविण्याचे काम करतात ते म्हणजे आपले गुरु. त्यांचा आपल्या जीवनात सर्वांत महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून अनेकजण आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देताना दिसत आहे. कोणी आपल्या मनातल्या भावना कवीतांमध्ये मांडत आहे. तर कोणी 2 ओळींमध्ये पंरतु सर्वांमध्ये आपल्या शिक्षकाविषयी तेवढाच आदर दिसत आहे.