मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : यंदाचे वर्ष भारतीय चित्रपटांसाठी सुवर्णकाळ घरेऊन आले आहे.नुकतेच नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्तम गाण्याचे ऑस्कर मिळाले तर गुनीत मोंगा यांच्या द एलिफंट व्हिस्पर्स नावाच्या माहितीपटाला सर्वोत्तम डॉक्यमेंट्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले. यामुळे देशभर बरीच चर्चा झाली आणि सगळ्यांनी यासाठी आनंद देखील व्यक्त केला. परंतु अलीकडेच गुनीत मोंगा यांनी आपल्या या यशाबदल आपले मत व्यक्त केले आहे. हे पाहून नेटकरी आता चकित झालेत.
गुनीत मोंगा आणि त्यांच्या टीमला ऑस्कर मिळाल्यानंतर देशातून त्यांच्यावर कौतूकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. इतकेच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना भेटण्यासाठी बोलावले होते. आपल्याच देशात नाही तर परदेशातून देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.परंतु यासगळ्यात मोंगा यांनी एका गोष्टीबाबत खंत व्यक्त केली आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत मोंगा यांनी आपली खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या कि,” लोकांना ऑस्कर आणि ऑस्करच्या ट्रॉफीचे खूप कौतूक असते. भारताला दीड दशकांच्या कालावधीनंतर ऑस्कर मिळाला आहे. याचा आनंद मोठा आहे. प्रेक्षकांचा, चाहत्यांचा आनंद मी समजू शकते. पण सगळ्यांना फक्त ऑस्करचे कौतूक आहे. मात्र ते कोना मुले मिळाले याचे नाही . याच गोष्टीचे मला आश्चर्य वाटते. अनेक जण फोटो काढण्याची विनंती करतात पण तो फोटो माझ्यासाठी नसून त्या ट्रॉफीसाठी असतो. अशा शब्दांत मोंगा यांनी खंत व्यक्त केली आहे.