का चिडला अभिषेक ?

मुंबई, ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन हे बॉलिवूड सिनेसृष्टीतील उत्तम जोडी म्हणून पाहिलं जात. अनेकदा हे दोघे समाज माध्यमांवर त्यांचे फोटो सामायिक करत असतात. अभिनेत्री ऐश्वर्या दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियीन सेलवन २’ या चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकली आहे. तर, अभिषेक बच्चन ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाला आहे. त्याने पोंनीयन सेल्वन चित्रपट […]

का चिडला अभिषेक ?

मुंबई, ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन हे बॉलिवूड सिनेसृष्टीतील उत्तम जोडी म्हणून पाहिलं जात. अनेकदा हे दोघे समाज माध्यमांवर त्यांचे फोटो सामायिक करत असतात. अभिनेत्री ऐश्वर्या दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियीन सेलवन २’ या चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकली आहे. तर, अभिषेक बच्चन ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाला आहे. त्याने पोंनीयन सेल्वन चित्रपट पाहून ऐश्वर्याचं कौतुक करत चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर सामायिक केला.अभिषेकने ट्विटरवर लिहिलं की, ‘पोन्नियीन सेलवन २’ हा चित्रपट उत्तम आहे. माझ्याकडे या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी शब्दच नाही.

संपूर्ण टीमने चांगले काम केलं असून मला माझ्या बायकोचा अभिमान वाटतोय. मला असं वाटतं की, या चित्रपटातील ऐश्वर्याची भूमिका आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात उत्तम भूमिका आहे, असं त्यांनी लिहिलं. दरम्यान, पत्नीच्या अभिनयाचं केलेलं कौतुक पाहून अनेक नेटकऱ्यांनी अभिषेकचं कौतुक केलं.तर काही नेटकऱ्यांनी अभिषेकला ट्रोल केलं. तुला ऐश्वर्याचा अभिमान असू दे, तिला आणखीन चित्रपटात अभिनय करू दे. मात्र, तू आराध्याला संभाळ असं म्हणत एका ट्रॉलरने अभिषेकला सुनावले.

ट्रोलरचं हे वक्तव्य पाहून अभिषेकनेदेखील त्याला सडेतोड उत्तर दिल. ‘चित्रपट साइन करु देऊ? सर, तिला कोणत्याही गोष्टीसाठी माझ्या परवानगीची गरज लागत नाही. खास करुन ज्या गोष्टीवर तिचे प्रेम आहे त्या गोष्टीसाठी तर मुळीच नाही.’ अभिषेकने ट्रोलरला दिलेल्या उत्तराची समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगताना दिसतेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number