बैलासमोर का नाचली गौतमी ?

मुंबई,२८ एप्रिल २०२३,प्रतिनिधी : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांची नेहमी चर्चा होत असते. दिवसेंदिवस समाज माध्यमांवर तिचा विषय काहीसा गंभाईर होताना दिसत आहे . अशातच तिचा आणखी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. सदर व्हिडिओ हा तिच्या मुळशी येथील कार्यक्रमाचा आहे. अलीकडेच गौतमीचा मुळशी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ बराच गाजतोय. हा कार्यक्रम मुळशी […]

बैलासमोर का नाचली गौतमी ?

मुंबई,२८ एप्रिल २०२३,प्रतिनिधी : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांची नेहमी चर्चा होत असते. दिवसेंदिवस समाज माध्यमांवर तिचा विषय काहीसा गंभाईर होताना दिसत आहे . अशातच तिचा आणखी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. सदर व्हिडिओ हा तिच्या मुळशी येथील कार्यक्रमाचा आहे.

अलीकडेच गौतमीचा मुळशी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ बराच गाजतोय. हा कार्यक्रम मुळशी तालुक्यात एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओत गौतमीच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक नाही तर चक्क एक बैल येऊन उभा राहिलेला दिसत आहे. विशेष म्हणजे गौतमीने चक्क या बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

कार्यक्रमाचे आयोजक् राजेंद्र यांनी सांगितले की,’ आमच्याकडे लग्नात दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा आहे, त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक काढली जाते . आता हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मिरवणूक न काढता आम्ही गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केला.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number