विद्यार्थ्यांचे आंदोलन का आणि कसे झाले?

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलन का आणि कसे झाले? राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे जोवर कोरोना आहे, […]

विद्यार्थ्यांचे आंदोलन का आणि कसे झाले?

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

आंदोलन का आणि कसे झाले?

राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे जोवर कोरोना आहे, तोवर परीक्षा पुढे घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा न घेता परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी राज्यभरात आंदोलन करत आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेमधून बळजबरी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे जास्तीचे शुल्क बंद करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागणीवर मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अखेर आज राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मुंबईतील धारावी येथील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. तर हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक धारावीमध्ये शालेय शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. दरम्यान, विद्यार्थी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज  केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number