सत्तास्थापना लांबणीवर? कोण होणार मुख्यमंत्री?

महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार असल्याची माहिती मिळत आहे . त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलाही ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सत्तास्थापना लांबणीवर? कोण होणार मुख्यमंत्री?

मुंबई: विधानसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली. यांनतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार? त्यातच आता महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार असल्याची माहिती मिळत आहे . त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलाही ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनीनुसार मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून भाजपला 21 मंत्रिपदे , शिवसेनेला 12 मंत्रिपदे तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे मिळणार आहेत. महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबईत होणार असून महायुतीचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सर्वांचं पडला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली.  त्यामुळे आता या महायुतीत नेमकं कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार असल्याची माहिती मिळत असून महायुती 27 किंवा 28 तारखेला सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number