सरपंच हत्याप्रकरणाचा आका कोण? सुरेश धस बोलले..

भाजपाचा आमदार संतोष देशमुख प्रकरणावर का आक्रमक?<br/><br/>

सरपंच हत्याप्रकरणाचा आका कोण? सुरेश धस बोलले..

आव्हाडांनी काय बोलाव? हा त्यांचा प्रश्न. वाल्मिक आणि मुंडेच नाव मी घेतले नाही. मी कोणाच राजीनामा मागितला नाही. गॅगने अतिशय निर्घुण हत्या केली आहे. मारायचं होतं तर गाडीखाली घालायचं नाहीतर गोळी घालायची एवढी निर्घुण हत्या केली.पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. प्रकरण गंभीर आहे. संतोष देशमुख गुंड आहे का? त्यावर काही गुन्हा नोंद आहे का? असं काहीच नाही. आमच्या बुथ प्रमुखाची हत्या झाली आहे.आज मुख्यमंत्री सभाग्रुहात उत्तर देणार आहेत. आणि ते म्हणाले आहेत की मी कोणाला सोडणार नाही. ३०७ कोणावर लादल्या गेल्या त्याचा रेकॉर्ड काढा. एसपींना मी विचारलं आहे की मला रेकॉर्ड दाखवा. ४० जणांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत.

पंकजा मुंडेवर टीका 

पंकजा मुंडे यांनी माझ्या मतदारसंघात कमळाचा प्रचार केलेला नाही. मी आजही म्हणतो. कमळाच्या विरोधात पंकजा मुंडेनी काम केलंय. मंत्री पद हा पक्षाचा निर्णय आहे. मी छोटा माणूस आहे. काम न केल्याचा माझ्याकडे पुरावा आहे. पक्षश्रेष्ठींना मी सांगितलेलं आहे, ते निर्णय घेतील.

गॅंगचा आका कोण आहे?

गॅंगचा आका कोण आहे हे तपासलं पाहिजे, असंही संतोष देशमुख यांनी स्पष्ट केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number