Ashok Kharat Case Nashik : भोंदू खरातचा पर्दाफाश करणारा पत्रकार गोत्यात; सोशल मीडियावर महिलेसोबत फोटो व्हायरल

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Case Nashik : भोंदू खरातचा पर्दाफाश करणारा पत्रकार गोत्यात; सोशल मीडियावर महिलेसोबत फोटो व्हायरल

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात खरात प्रकरणातील सातत्याने पाठपुरावा करणारे पत्रकार खेमनर यांना सोशल मीडियावर टार्गेट करण्यात येत असून, त्यांच्या बदनामीचे मोठे षड्यंत्र रचले जात असल्याचे समोर आले आहे. खरात आणि चाकणकर समर्थकांकडून खेमनर यांचे एका महिलेसोबतचे जुने फोटो आणि 2018 मधील एका गुन्ह्याची माहिती जाणीवपूर्वक व्हायरल केली जात असल्याचा आरोप खुद्द दत्तात्रय खेमनर आणि संबंधीत महिलेने केला आहे. पीडित महिला आणि खेमनर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधीत महिला स्वतः समोर आली असून तिने संताप व्यक्त केला आहे. “माझ्या जुन्या प्रकरणाचा वापर करून कोणाचे चारित्र्यहनन होत असेल, तर ते सहन करणार नाही. माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार,” असा इशारा पीडित महिलेने दिला आहे.

हेही वाचा : Ashok Kharat Nashik Case : केसरकर, चाकणकर यासारख्या लोकांनी खरातला पोसलं, यांचे आर्थिक सोर्स काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number