अल्पावधीत प्रसिद्ध झालेली गौतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अहमदनगरमधील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
गौतमी पाटीलच्या चेंजिंग रूममधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई सुरु आहे. या प्रकरणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हा मुलगा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील पीसोरेखांड येथील आहे. या मुलाच्या आई वडिलांना नोटिस देऊन पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
या मुलाने गौतमी पाटीलच्या नावाने इन्सटाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. तसेच त्या अकाउंटवर तिचे फोटोदेखील व्हायरल केल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी कारवाई करत तपास केला असता त्यामध्ये या अल्वपयीन मुलाने वापरलेले सिम कार्ड त्याच्या आईच्या नावावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणी तो मुलगा लहान आहे. तो मुलगा तर सापडलाच आहे पण आणखी काहीजण आहेत तेही सापडतीलच. इतक्या दिवसांनी काहीतरी चांगलं घडलं याचा मला आनंद आहे. असं वक्तव्य गौतमी पाटील हिने केलं आहे.
परंतु, या आधी हा व्हिडीओ मस्करी म्हणून एका महिलेनेच काढल्याची माहिती गौतमी पाटील हिने दिली असताना यामध्ये आता अचानकपणे अल्पवयीन मुलाचा संबंध कसा काय आला? ही पेचात पाडणारी बाब आहे. एकाच प्रकरणावर वेगवेगळी दोन वक्तव्य असल्याने हे प्रकरण नेमकं काय आहे? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.