उन्हाळ्याच्या दिवसांत थंड पाणी पिणे आपल्याला आवडते. पण काही लोक थंड पाणी साठवण्यासाठी वॉटर कुलरमध्ये बर्फ ठेवतात.तर अनेकजण काचेच्या बाटलीत पाणी भरून थेट फ्रीझर मध्ये ठेवतात. मात्र असे केल्याने काचेची बाटली फुटू शकते.
फ्रीजरमध्ये का तडकते काच ?
पाण्याने भरलेली काचेची बाटली फ्रीजरमध्ये ठेवल्यावर, फ्रीजरच्या आतल्या तापमानामुळे पाणी गोठून त्याचा बर्फ होतो. जेव्हा पाणी गोठते तेव्हा त्याची घनता कमी होते कारण बर्फ पाण्यापेक्षा कमी घनतेचा असतो. यामुळे द्रव्यमान झाल्याने त्यातून कोणत्याही प्रकारची गळती होत नाही.
सरळ शब्दात सांगायचे झाले तर, बर्फाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने बर्फ जास्त जागा व्यापतो. त्यामुळे बाटली फुटू शकते. तथापि, हे त्या बाटलीत असलेल्या पाण्याच्या प्रमाणावरही अवलंबून असते.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये पाणी ठेवताना चुकूनही स्वस्त प्लास्टिकची बाटली वापरू नये. अशा बाटलीमध्ये बॅक्टेरिया असतात. तसेच फ्रीजमध्ये बाटली ठेवायची उत्तम दर्जाची बाटली घ्यावी. त्यामुळे तुम्ही कोणत्याही बॅक्टेरियाच्या संसर्गापासून सुरक्षित राहाल.