BJP Campaign Controversy: महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा ? ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेचा भाजपला सवाल

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोरच हा नाचगाण्याचा प्रकार घडल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.<br/>

BJP Campaign Controversy: महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा ? ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेचा भाजपला सवाल

BJP Campaign Controversy: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने खालची पातळी गाठल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. वॉर्ड क्रमांक 157 मधील भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचार कार्यक्रमात चक्क महिलांच्या डान्सचे आयोजन करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोरच हा नाचगाण्याचा प्रकार घडल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रचाराचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात केवळ वाटपच झाले नाही, तर गर्दी जमवण्यासाठी महिलांच्या डान्सचा ‘इव्हेंट’ही पार पडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला महापुरुषांच्या पुतळ्यासमोर नृत्य करताना दिसत आहे. यावरून आता मुंबईच्या राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Ambernath Municipal Election 2026: मोठी राजकीय उलथापालथ! अंबरनाथमध्ये शिवसेनेला धक्का, भाजप-काँग्रेस एकत्र

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते अखिल चित्रे यांनी या प्रकाराचा व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांसमोर अशा प्रकारे नाचगाणे करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? कार्यक्रमाचे संयोजक सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी आहेत. अशा मानसिकतेची माणसे पवित्र मंदिरांच्या ट्रस्टवर नेमताना भाजपला लाज वाटली नाही का? सत्तेची मस्ती चढलेल्या या लोकांना धडा शिकवण्यासाठी मुंबईकरांनी ‘शिवटोला’ द्यावा, असे आवाहन चित्रे यांनी आशिष शेलार यांना टॅग करत केले आहे.

हेही वाचा – Nashik Municipal Election: नाशिकमध्ये भाजपला मोठे भगदाड; दोन माजी महापौरांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई महापालिकेसाठी यावेळी ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला असताना, भाजप-शिवसेना युतीसमोर आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान आहे. अशातच प्रचाराच्या या ‘फंडा’मुळे भाजपची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number