Kishori Pednekar: ‘आम्ही पेंग्विन आणले तेव्हा आमच्यावर मोठी टीका झाली, पण आता…’; BMC च्या कारभारावर किशोरी पेडणेकर यांचा संताप

&quotआम्ही पेंग्विन आणले तेव्हा आमच्यावर मोठी टीका झाली, पण आज या सुविधांच्या देखभालीकडे कोणाचेच लक्ष नाही,&quot असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.<br/>

Kishori Pednekar: ‘आम्ही पेंग्विन आणले तेव्हा आमच्यावर मोठी टीका झाली, पण आता…’; BMC च्या कारभारावर किशोरी पेडणेकर यांचा संताप

Kishori Pednekar: मुंबईतील प्रसिद्ध वीर जिजामाता उद्यान (राणीची बाग) येथे एका लहान मुलाचा खेळताना भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा एक डोळा निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची दखल घेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बागेची पाहणी केली आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. “आम्ही पेंग्विन आणले तेव्हा आमच्यावर मोठी टीका झाली, पण आज या सुविधांच्या देखभालीकडे कोणाचेच लक्ष नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.

घसरगुंडीच्या पत्र्यामुळे मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, राणीच्या बागेतील घसरगुंडीचा पत्रा उखडलेला होता, ज्याची धार लागल्याने एका चिमुरड्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. या अपघातात मुलाला 3 टाके पडले असून डॉक्टरांच्या मते त्याला पुढील 18 वर्षांपर्यंत एका डोळ्याने पाहता येणार नाही आणि कायमस्वरूपी चष्मा वापरावा लागेल. “लाखो मुले इथे आनंदाने येतात, पण अशा एका प्रसंगामुळे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होते. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करायला हवी होती,” असे पेडणेकर यांनी नमूद केले.

‘पेंग्विन’वरून विरोधकांना प्रत्युत्तर
राणीच्या बागेतील विकासकामांवरून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “आम्ही जेव्हा पेंग्विन आणले, तेव्हा आमच्यावर खूप टीका करण्यात आली. मात्र, त्याच पेंग्विनमुळे आज राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे. आम्ही वाघ आणि सिंह आणण्यासाठी सर्व पत्रव्यवहार आणि प्रक्रिया पूर्ण केली होती, पण सुविधांच्या देखभालीत होणारी ही दिरंगाई संतापजनक आहे.” तक्रार करूनही प्रशासनाने पत्र्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा –  MP’s For Rajya Sabha : राज्यसभेच्या या 7 उमेदवारांची खासदारपदी अधिकृत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा; विधान भवनात प्रमाणपत्र सुपुर्द

बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न
अपघातातील मुलगा मुंबईचा नसून ठाणे किंवा इतर भागातून आला असावा, असे सांगत पेडणेकर यांनी बीएमसीकडे (BMC) मदतीची मागणी केली. “मुलगा बाहेरचा असला तरी बीएमसीने त्याला आर्थिक मदत आणि विम्याचे (Insurance) कवच दिले पाहिजे. येथील सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझर यांनी अधिक नम्रपणे आणि सतर्कतेने वागायला हवे. ही बाग भोसले उद्यान आणि जिजामाता उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे, तिची प्रतिष्ठा राखण्यासाठी सुरक्षा आणि देखभालीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number