WhatsApp Down: व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात अडचण, हजारो वापरकर्त्यांनी केली Outage संदर्भात तक्रार

डाउनडिटेक्टरच्या मते, भारत, अमेरिका आणि यूकेसह अनेक देशांमध्ये या प्लॅटफॉर्मवर आउटेज आढळून आले. लोक मेसेज पोहोचत नसल्याच्या तक्रारी करत आहेत.

WhatsApp Down: व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात अडचण, हजारो वापरकर्त्यांनी केली Outage संदर्भात तक्रार
Edited Image

WhatsApp Down: शुक्रवारी व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले. डाउनडिटेक्टरच्या मते, भारत, अमेरिका आणि यूकेसह अनेक देशांमध्ये या प्लॅटफॉर्मवर आउटेज आढळून आले. लोक मेसेज पोहोचत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. तथापि, याबद्दल व्हॉट्सअॅपकडून अद्याप कोणतेही विधान जारी केलेले नाही. व्हॉट्सअॅप आउटेजच्या 4400 हून अधिक तक्रारी पाहिल्यानंतर आउटेज रिपोर्टिंग पोर्टल डाउन डिटेक्टरने ही माहिती दिली आहे. नेहमीप्रमाणे, लोकांनी थेट सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याची माहिती दिली. अनेक लोकांनी मीम्स पोस्ट केले आणि मेसेजिंग अॅप खरोखरच बंद आहे की, नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न केला. 

व्हॉट्सअॅप आउटेजमुळे ट्विटरवर #Whatsappdown ट्रेंड –  

व्हॉट्सअॅप आउटेजच्या तक्रारी आल्यानंतर लगेचच भारतात ट्विटरवर #Whatsappdown ट्रेंड होऊ लागला. इंटरनेट अॅप ट्रॅकिंग साइट डाउनडिटेक्टरनुसार, शुक्रवारी रात्री 9.10 वाजताच्या सुमारास ही समस्या सुरू झाली. अनेक वापरकर्त्यांनी शेअर केले की, त्यांना वाटले की त्यांच्या वायफाय किंवा डेटामध्ये समस्या आहे, परंतु प्रत्यक्षात व्हॉट्सअॅप डाउन होते. 

हेही वाचा – Meta ने भारतात एका महिन्यात बंद केले 80 लाख WhatsApp अकाउंट; काय आहे कारण? जाणून घ्या

तथापी, व्हॉट्सअॅप डाउन झाल्यानंतर किमान 20 मिनिटांनी, 9.32 च्या सुमारास समस्या सुटण्यास सुरुवात झाली. काही वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅप कॉलमध्ये समस्या येत असल्याची तक्रार केली. डाउनडिटेक्टरच्या मते, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई हे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र होते, तर संपूर्ण भारतात किरकोळ व्हॉट्सअॅप डाउन झाल्याची नोंद झाली.

हेही वाचा – Girlfriend ने Delete केलेला WhatsApp मेसेज कसा Recover करायचा? जाणून स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर डाउन होताच, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने म्हटलं, 'तुमचा एअरप्लेन मोड चालू-बंद करू नका, वारंवार रिफ्रेश करू नका, ही तुमची नेटवर्क समस्या नाही, आज व्हॉट्सअॅप डाउन आहे!' तथापी, आतापर्यंत, व्हॉट्सअॅप आउटेजसंदर्भात मेटाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. याआधीही मेटा प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा जागतिक आउटेज दिसून आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number