बुधवारी न्यायालयात काय युक्तिवाद झाला ?

महाराष्ट्रात शिवसेना पक्षाच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात वाद सुरु आहे. यावर बुधवार, १५ फेब्रुवारी २०२३ ची सुनावणी संपली आहे. तरीही, अजून निकालाची प्रतीक्षा सुरूच आहे. आता, गुरुवारी, १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे. मंगळवारी, १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उद्धव गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. मंगळवारी उद्धव गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या […]

बुधवारी न्यायालयात काय युक्तिवाद झाला ?

महाराष्ट्रात शिवसेना पक्षाच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात वाद सुरु आहे. यावर बुधवार, १५ फेब्रुवारी २०२३ ची सुनावणी संपली आहे. तरीही, अजून निकालाची प्रतीक्षा सुरूच आहे. आता, गुरुवारी, १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे.
मंगळवारी, १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उद्धव गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. मंगळवारी उद्धव गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करताना अरुणाचल प्रदेशमध्ये २२ आमदारांचं निलंबन झालेला नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला दिला होता. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी सुरु झाल्यावर ‘रेबिया प्रकरणाला बाजूला ठेवून विचार करूया’ असा सल्ला सरन्यायाधीशांनी दोन्ही गटांना दिला.
बुधवारी, १५ फेब्रुवारी २०२३ रोजी शिंदे गटाच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद पाहूया –

शिंदे गटाचा युक्तिवाद –

सर्व प्रकरण पक्षांतर्गत लोकशाहीनुसार आहे.
एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आमदार गेलेले नाहीत.
पक्ष नेतृत्वाचे विचार नाकारण्याचा आमदारांना अधिकार आहे.
पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या नेतृत्वाशी पक्षाचे आमदार असहमत असू शकतात.
असहमत असणे म्हणे पक्ष सोडला असे नव्हे.
ही फूट नसून पक्षांतर्गत मतभेद आहे.
मतभेद व्यक्त करणे म्हणजे पक्षांतर नाही.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number