Abhijeet Dipke: जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची पुढील रणनीती काय? अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केली भूमिका

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, यासाठी त्यांनी 7 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे.

Abhijeet Dipke: जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची पुढील रणनीती काय? अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केली भूमिका

Abhijeet Dipke:  दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) सर्वेसर्वा अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, यासाठी त्यांनी 7 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या विहित मुदतीत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात पसरवले जाईल, असा स्पष्ट इशारा दीपके यांनी दिला आहे.

ऐतिहासिक आणि शांततापूर्ण चळवळीची सुरुवात
आंदोलनाची पहिली पायरी यशस्वी झाल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात अभिजीत दीपके यांनी सहभागी झालेल्या सर्व आंदोलक आणि समर्थकांचे आभार मानले. हे आंदोलन ऐतिहासिक आणि अत्यंत शांततापूर्ण मार्गाने पार पडल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी देशातील असा तरुण वर्ग या आंदोलनात एकत्र आला होता, ज्यांनी यापूर्वी कधीही कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक आंदोलनात पाऊल ठेवले नव्हते. ही केवळ एका मोठ्या क्रांतीची सुरुवात असून, शिक्षण क्षेत्रातील गोंधळामुळे संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आल्याने याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीवर त्यांनी भर दिला.

इन्स्टाग्रामवरून साधणार संवाद
अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत त्यांनी देशातील युवा पिढीवर मोठा अन्याय केल्याचे म्हटले आहे. पुढील 7 दिवसांत मंत्र्यांची हकालपट्टी झाली नाही, तर आंदोलन उग्र रूप धारण करेल, असा सज्जड दम त्यांनी भरला. आंदोलनाची पुढील दिशा आणि आंदोलनाचा देशव्यापी आराखडा काय असेल, हे स्पष्ट करण्यासाठी ते लवकरच इन्स्टाग्रामवरील ‘लाईव्ह’ सत्राच्या माध्यमातून थेट जनतेशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपली पुढील रणनीती जाहीर करणार आहेत.

सरकारने मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा उद्रेक होईल: प्रवक्ते आशिष रंका
दरम्यान, शनिवारी जंतर-मंतरवर अनेक तास चाललेल्या प्रचंड घोषणाबाजी आणि निदर्शनांनंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित करण्यात आले असले, तरी आयोजकांनी सरकारला एका आठवड्याची मुदत देऊन कोंडीत पकडले आहे. CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशिष रंका यांनी संघटनेची भूमिका मांडताना सांगितले की, सरकारकडे आता विचार करण्यासाठी केवळ 7 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी एकतर सन्मानपूर्वक आपले पद सोडावे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. तसे न झाल्यास देशाच्या कानाकोपऱ्यात तीव्र निदर्शने सुरू केली जातील. देशाची शिक्षण व्यवस्था आमूलाग्र बदलण्याची वेळ आता आली असून, या परिवर्तनाची ठिणगी जंतर-मंतरवरून पडली असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा – Nitin Nabin: ‘परदेशात बसून तरुणांची दिशाभूल…’; जंतरमंतरवरील ‘CJP’च्या आंदोलनावर नितीन नबीन यांचा संताप

परदेशी भूमीवरून तरुणांना भडकवण्याचा डाव 
या संपूर्ण आंदोलनावर आणि ‘CJP’च्या इशाऱ्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही (भाजप) अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे नेते नितीन नवीन यांनी आंदोलनाचा रोख थेट परदेशी शक्तींकडे वळवला आहे. काही विशिष्ट व्यक्ती परदेशात आरामात बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांची दिशाभूल करण्याचा आणि त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा पद्धतशीर कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. परीक्षा पद्धती आणि शिक्षण क्षेत्रातील कथित मुद्द्यांवरून दिल्लीत हजारो तरुण रस्त्यावर उतरलेले असतानाच भाजपच्या वतीने हे महत्त्वाचे काउंटर स्टेटमेंट समोर आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number