‘तुमचा दाभोळकर करु ही धमकी नाही तर काय?’

मुंबई, १० जून २०२३, प्रतिनिधी : आम्ही तुमचा दाभोलकर करू, ही धमकी नाही का, असा खडा सवाल शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शरद पवार यांना सौरभ पिंपळकर याने ट्विटरवरून धमकी दिली आहे. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. सौरभ पिंपळकर अमरावतीचा असून, तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पिंपळकरचे भाजप प्रदेशाध्यक्ष […]

‘तुमचा दाभोळकर करु ही धमकी नाही तर काय?’

मुंबई, १० जून २०२३, प्रतिनिधी : आम्ही तुमचा दाभोलकर करू, ही धमकी नाही का, असा खडा सवाल शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शरद पवार यांना सौरभ पिंपळकर याने ट्विटरवरून धमकी दिली आहे. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत.

सौरभ पिंपळकर अमरावतीचा असून, तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पिंपळकरचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतचे फोटोही समोर आलेत. त्यामुळे धमकी देणे आमच्या रक्तात नाही, असे म्हणणाऱ्या बावनकुळेंची आणि भाजपची कोंडी झाल्याचे दिसते.

अजित पवार म्हणाले की,
जर एखादी व्यक्ती आम्ही तुमचा दाभोलकर करू म्हणते म्हणजे काय करू म्हणते? डॉक्टर करू? ते डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करू. पवार साहेब पण डॉक्टरेट आहेत. त्याच्यामुळे याला काही अर्थ नाही. भारताला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, त्यांना काय म्हणायचे आहे ते. बावनकुळे सारख्या व्यक्तींकडून अशी अपेक्षा अजिबात नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number