मुंबई , २८एप्रिल २०२३, प्रतिनिधी :अभिनेत्री जिया खान हिने ३ जून २०१३ रोजी जुहू येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला ह्याला अटक करण्यात आली होती.जिया आणि सूरज यांच्या मध्ये प्रेमसंबंध होते आणि तो सतत तिच्या जवळपास असायचा जियाला आत्महत्या करण्यासाठी सूरजनेच भाग पडले, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. जियाच्या आईने सूरजवर आरोप करून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सूरजला काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला. १ जून २०१३ रोजी सूरज पांचोलीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर १ जुलै २०१३ रोजी अभिनेत्याची जामिनावर सुटका झाली.
जिया खानने आत्महत्या केली तेव्हा तिच्याकडे सुसाईड नोट सापडली. आणि त्या पत्रात जियाने सूरजसोबत आपलं प्रेम असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, सूरजने तिच्यासोबत चुकीचे वर्तन करण्यास सुरुवात केली होती. सूरजने एकदा मला घरातून देखील बाहेर काढलं होतं. त्याच्या या वागण्याने मी दुखी झाले होते, असं तिने त्या सूसाईडनोटमध्ये म्हटलं होतं. सूरजच्या सांगण्यावरूनच जियाने गर्भपात केल्याचा दावाही जियाच्या आईने म्हणजेच राबिया खान यांनी केला होता.
राबिया खान गेल्या १० वर्षांपासून आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी करत होत्या.सीबीआय कोर्टने आज निकाल जाहीर केला असून सूरजची निर्दोष सुटका केली आहे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सूरजने कोर्टाचे आभारही मानले. या निकालावर सूरजची आई अभिनेत्री जरीना वहाब यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, जियाची आई राबिया या निर्णयाने खूश नाहीये.कोर्टाने दिलेला निर्णय पाहून अनेक चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.सूरजला निर्दोष ठरवण्यासाठी बॉलिवूड मधील मोठ्या कलाकारांची साथ असल्याचा असा दावा आता चाहत्यांकडून करण्यात येत आहे.