अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात खडाजंगी, काय झालं नेमकं?           

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात खडाजंगी उडाल्याचे दिसून आले. विधानसभेतील कामकाजादरम्यान बोलताना अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वाशी येथील परिवहन कार्यालयातील वाहनांचा कर वसूल करण्याबाबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी प्रश्न विचारला. मंगल प्रभात […]

अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात खडाजंगी, काय झालं नेमकं?           

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात खडाजंगी उडाल्याचे दिसून आले. विधानसभेतील कामकाजादरम्यान बोलताना अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

वाशी येथील परिवहन कार्यालयातील वाहनांचा कर वसूल करण्याबाबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी प्रश्न विचारला. मंगल प्रभात लोढा यांनी विचारलेल्या प्रश्नावर अनिल परब उत्तर देत होते. त्यादरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी मध्येच बोलण्यास सुरूवात केली. त्यामुळे अनिल परब संतापून म्हणाले, त्यांनी प्रश्न विचारला, मी त्यांना उत्तर देतो. तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही बोला.

वाहनांवरील कर वसुलीबाबत अनिल परब उत्तर देताना मध्येच नितेश राणे यांनी बोलायला सुरुवात केली. त्यामुळे अनिल परब संतापून म्हणाले, मला त्यांनी प्रश्न केला, मी त्यांना उत्तर दतो, तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही बोला. नितेश राणे आसनस्थ न झाल्याने परबांनी आक्षेप घेतला. तुम्ही तुमच्या जागेवर जा. आणि सभापतींनी परवानगी दिल्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित कला.

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परबांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘आपण आसन क्रमांक सांगावे त्या आसनावर सदस्य बसतील. आसन क्रमांक ९६ आम्ही त्यांना दिला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला केवळ आसन अलॉट करून देतात तर आम्ही आमचे आसन ठरवतो.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number