Mamata Banerjee: ‘अनेक ठिकाणी मतमोजणी जाणीवपूर्वक रोखली!’; ममता बॅनर्जींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, कार्यकर्त्यांना दिला मोठा संदेश

पश्चिम बंगाल मतमोजणीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी 100 ठिकाणी मतमोजणी थांबवल्याचा आरोप करत भाजपवर कटाचा आरोप केला आहे.

Mamata Banerjee: ‘अनेक ठिकाणी मतमोजणी जाणीवपूर्वक रोखली!’; ममता बॅनर्जींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, कार्यकर्त्यांना दिला मोठा संदेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अत्यंत चुरशीची परिस्थिती निर्माण झाली असतानाच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी दावा केला की, राज्यातील जवळपास 100 ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया जाणीवपूर्वक रोखण्यात आली आहे. भाजपचा हा पूर्वनियोजित कट असून, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये त्यांचे निकाल आधी दाखवायचे आणि आमचे निकाल नंतर, असे राजकारण खेळले जात असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या विधानामुळे बंगालमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोट ठेवताना ममता बॅनर्जी यांनी कल्याणी येथील घटनेचा दाखला दिला. कल्याणमध्ये सात मशिनमध्ये मोठी तफावत आढळल्याचे त्यांनी सांगितले. “निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा दले आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. आमचे पोलीस दल देखील केंद्रीय दलांच्या दबावाखाली काम करत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दडपण आणण्यासाठी केंद्रीय बलांचा गैरवापर केला जात असून, अनेक ठिकाणी पक्षाची कार्यालये फोडून ती बळकावण्यात आल्याचेही त्यांनी या संदेशात नमूद केले आहे.

ममता बॅनर्जी यांनी माध्यमांवरही खोट्या बातम्या पसरवल्याचा ठपका ठेवला आहे. त्या म्हणाल्या की, “भाजपने जिथे शक्य होते तिथे मतांची लूट केली आहे. तरीही अजून 70 ते 100 जागा अशा आहेत जिथे तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे, परंतु या जागांचा अहवाल जाणीवपूर्वक दिला जात नाहीये. केवळ चुकीच्या बातम्या पेरल्या जात असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.” निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा: Tamil Nadu Election 2026 | पहिल्याच निवडणुकीत नाणं खणाणलं, TVK चा दणदणीत ‘विजय’; तामिळनाडूच्या निवडणुकीत उलथापालथ

त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि मतमोजणी प्रतिनिधींना (Counting Agents) खचून न जाण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. “कोणीही मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नका. हा भाजपचा मोठा प्लॅन आहे. जरी सुरुवातीच्या तीन-चार फेऱ्यांमध्ये चित्र वेगळे दिसत असले तरी, एकूण 14 ते 18 फेऱ्यांची मतमोजणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे संयम राखा आणि शेवटपर्यंत तिथेच थांबा,” असे निर्देश त्यांनी दिले आहेत. कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत मार्गदर्शन केले आहे.

“सूर्यास्तानंतर विजय आपलाच असेल, हे लक्षात ठेवा. आपण वाघाच्या बछड्यासारखे लढू,” असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. आपण आणि आपला पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाहि त्यांनी दिली. निकालाच्या अंतिम टप्प्यात चित्र पूर्णपणे बदलेल आणि तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मतमोजणी केंद्रांवरील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता निवडणूक आयोग या आरोपांवर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: West Bengal Elections 2026: ममता दीदींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग! ‘भाजपचे पितामह’ श्यामा प्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये मोदी-शाहाने कसं फुलवलं कमळ ?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number